ठाकरे-गडाख-कर्डिलेंचे चाललेय तरी काय? चर्चेला उधाण | पुढारी

ठाकरे-गडाख-कर्डिलेंचे चाललेय तरी काय? चर्चेला उधाण

अहमदनगर : विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (उबाठा) आमदार उद्धव ठाकरे विधानभवनात आले होते. त्याच वेळी तेथे नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले लॉबीत उभे होते. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरे-कर्डिले यांची भेट घालून दिली.

काय चाललेय? अशी विचारणा ठाकरेंनी केली तर कर्डिले यांनीही ठाकरे यांच्या तब्यतेची विचारपूस केली. हस्तांदोलनावेळी हास्यकल्लोळही उडाला. ठाकरे-कर्डिले भेटीनंतर नव्या राजकीय गणितांची मांडणी करणारी चर्चा मात्र नगर जिल्ह्यात रंगलीय. मोठ्या माणसांची भेट हा योगायोग असे म्हणत कर्डिले यांनी संस्कृती जपल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा

सातारा : पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

अहमदनगर : ते ‘पिस्तूल’ कोणाचे? एकविरा चौकातील गूढ कायम

पुण्यात दिवसा घरफोडी करणारी स्वामी टोळी जेरबंद

Back to top button