शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत; स्थगिती उठविली | पुढारी

शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत; स्थगिती उठविली

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेली स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर दोन टप्प्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकार्‍याना सांगितले, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी सांगीतले.

आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदू नामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की, 91.4 टक्के विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 80 टक्के जागांची भरती होईल. तोपर्यंत 50 टक्के पदे भरण्यात येणार आहेत. ‘कायम’ शब्द वगळलेल्या पात्र अघोषित शाळा, कनिष्ठ कॉलेजातील पात्र तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यानुसार अनुदानपात्र अघोषित शाळांना 20 व यापूर्वी 20 अथवा 40 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असून 61 हजार शिक्षकांना मूळ प्रवाहात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचा दावा केसरकर यांनी गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख.

संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रुपाली कुरूमकर आदींना सांगीतले असल्याचेही गाडगे म्हणाले.

हेही वाचा

खडकीत टोळक्याने वाहने फोडली ; दहशत पसरविण्याचा प्रयत्न

यू-ट्यूबच्या मदतीने विद्यार्थी गिरवणार धडे !

एका मिनिटात तब्बल 239 दोरीउड्या, नाशिकच्या सात्विक निरगुडेचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Back to top button