अहमदनगर : कोतवाली पोलिसांकडून 27 गोवंशीय जनावरांची सुटका

file photo
file photo
Published on: 
Updated on: 

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्‍या पिकअपला कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात बुधवारी (दि.19) सापळा लावून पकडले आहे. या कारवाईत 27 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुलाब बनीलाल शेख (वय 33 वर्षे, रा.खंड ता. कर्जत, जि. अहमदनगर), मोहम्मद गौस फकीर महोम्मद कुरेशी (रा.बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमनगर) या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई दिपक भागुजी रोहकले यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक लाख 50 हजार रुपये किमतीचा बोलेरो पिकअप (एम एच 178बीडी 4070), तीस हजार रुपये किंमतीच्या दोन जर्सी गायी, पंचविस हजार रुपये किमतीची 25 जर्शी गाईची वासरे असा दोन लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news