नगर : 188 ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण प्रसिद्ध | पुढारी

नगर : 188 ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण प्रसिद्ध

नगर : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या 188 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागनिहाय आरक्षण यादी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालय, सजा, तहसील व पंचायत समिती कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षभरात मुदत संपणार्‍या 195 ग्रामपंचायतींची प्रभागरचना 17 मार्चलाच प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. सात ग्रामपंचायती वगळता 188 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला होता. त्यानुसार 26 जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप जाहीर करण्यात येऊन यावर 3 जुलैपर्यंत हरकती मागविल्या होत्या. उपलब्ध झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन शुक्रवारी (दि.14) ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रभागनिहाय आरक्षण संबंधित ग्रामपंचायत, सजा, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आले असून, नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारा मतदारयादीचा कार्यक्रम आयोगाने नुकताच जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमसाठी 1 जुलै 2023 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदारयादी वापरण्यात येणार आहे. येत्या 31 जुलै रोजी 188 ग्रामंचायतींची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार असून, त्यावर 7 ऑगस्टपर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध होणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
अकोले 26, संगमनेर 5, कोपरगाव 17, राहाता 12, श्रीरामपूर 17, राहुरी 22, नेवासा 16, शेवगाव 25, पाथर्डी 14, जामखेड 3, कर्जत 6, श्रीगोंदा 10, पारनेर 7, नगर 8.

हे ही वाचा :

पंजाब, हरियाणात पुरामुळे आतापर्यंत ५७ मृत्‍युमुखी, ५१८ गावे बाधित, पुन्‍हा अतिवृष्‍टीचा इशारा

पुणे-मिरज दुहेरीकरण मार्च 2024 पर्यंत होणार?

Back to top button