नगर : हळगाव येथे शेततळ्यात मायलेकांचे मृतदेह | पुढारी

नगर : हळगाव येथे शेततळ्यात मायलेकांचे मृतदेह

जामखेड (नगर ) : तालुक्यातील हळगाव येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तिघा मायलेकांचे मृतदेह गावातीलच एका शेततळ्यात बुधवारी (दि. 12) आढळले. त्यात एका मुलीचा समावेश आहे. चांदणी ऊर्फ उमा बबन पाचरणे (वय 31) दीपाली बबन पाचारणे (वय 11) व राजवीर बबन पाचारणे (वय 8) अशी त्यांची नावे असून, हे तिघेही 10 जुलै रोजी घरातून बेपत्ता झाले होते. त्याबाबत बबन पाचारणे यांनी 11 जुलै रोजी जामखेड पोलिस ठाण्यात दिली माहिती होती.

बुधवारी (दि. 12) दुपारी हळगाव येथील भीमराव महादू पिंपळे यांच्या शेततळ्यात या तिघांचे मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे आदींनी मृतदेह बाहेर काढले. दोन वैद्यकीय अधिकार्‍यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हे ही वाचा :

पुणे : महिलेला हायवा डंपरने चिरडले

नगर : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

Back to top button