

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून धूम स्टाईल पोबारा केल्याची घटना राहुरी शहरात घडली घडली.
अनिता सुरेश म्हसे (वय 50 वर्षे) या राहुरी शहरातील येवले इस्टेट येथे राहत आहेत. दि. 11 जुलै रोजी दुपारी घरातून शेतात जाण्यासाठी करपे इस्टेट ते येवले इस्टेट जाणार्या रोडने पायी जात होत्या.
समोरुन एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर दोन अनोळखी तरूण आले व अगदी जवळून मोटारसायकल घेत पाठीमागे बसलेल्या तरूणाने म्हसे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून तोडून गाडी धूम स्टाईलने चालवत चोरून नेले. काही क्षणातच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. अनिता सुरेश म्हसे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.