नगर : संगमनेरमध्ये निळा जनआक्रोश मोर्चा | पुढारी

नगर : संगमनेरमध्ये निळा जनआक्रोश मोर्चा

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घृण हत्या, मुंबई येथे इंजिनिअरिंगची शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार व हत्या या सारखे प्रकार सातत्याने होत आहे. यातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी (दि. 8) विविध मागासवर्गीय संघटनेच्या वतीने प्रांताकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागासवर्गीय समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय अत्याचार होत आहे. या विरोधात संगमनेर येथील सर्व मागासवर्गीय संघटना एकत्र येऊन संगमनेर बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा निळा जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात प्रवीण गायकवाड, राजू खरात, रवींद्र गिरी, विजय वाकचौरे, संदीप मोकळ, राम दारोळे, किशोर चव्हाण, बाबा खरात, बाळासाहेब गायकवाड, आशिष शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड येथील अक्षय भालेराव व मुंबई येथील हिना मेश्राम यांचे फाशीची शिक्षा व्हावी. मागासवर्गीय सर्वं विद्यार्थ्यांना शासनाने योग्य वेळेत शिष्यवृत्ती मिळावी. भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांचेवर जो प्राण घातक हल्ला झाला, त्या मारेकर्‍यांना त्वरीत अटक करून कारवाई करावी, गायरान जमीनीवर मागासवर्गीयांनी केलेल्या अतिक्रमणांना नियमित करावे. महाराष्ट्रातील सर्व महिला वसतिगृह यांस महिला पोलिस संरक्षण देण्यात यावे. अ‍ॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या जातीयवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या वेळी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात महेश जेधे, किरण रोहम, अनिल भोसले, कैलास कासार आदींसह महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. अत्यंत शांत पध्दतीने हा मोर्चा पार पडला. संगमनेर शहर पोलिसांंनी चोख बंदोबस्त ठेवला.

मोर्चा कुठल्याही जाती, धर्माविरोधात नाही
मागासवर्गीय समाजावरील हल्ल्याच्या विविध घटनांचा तीव्र निषेध केला. दलितांवरील अन्याय अत्याचार संदर्भात प्रसार माध्यमाव्दारे काही जातीवादी संघटना समाजा- समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहे. सदर मोर्चा हा कुठल्याही जाती अथवा धर्माचे विरोधात नसून ज्या नराधमांकडून ह्या घटना घडल्या आहेत, त्या प्रवृत्तींच्या विरोधात हा विराट मोर्चा आहे. सदर मोर्चा हा शातंतेचे मार्गाने असून, मोर्चाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे.

Back to top button