

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोत्रे परिसरात बुधवारी दुपारी तीन ते साडेपाच वाजे दरम्यान सर्वदूर ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला. दहेगाव बोलका येथे 26 मि. मी. मीटर, कोपरगाव येथे 15 मि. मी. रवंदे येथे 4 मिमी, सुरेगाव येथे 5 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. शेतात पाणीच- पाणी होऊन पेरलेली पिके पुर्णतः वाया गेली. शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसाचे पाणी 25 ते 50 घरांमध्ये शिरले. समृद्धी महामार्गावरील पाणी शेतात गेल्याने पाण्याचा मोठा प्रवाह वाहताना दिसला. मुक्या जनावरांसह नागरिकांचे पावसामुळे मोठे हाल झाले.
सोयाबीन, मका आदी पेरलेल्या पिकांचे बी वाहून गेले. धोत्रे परिसरात खळवाडीत 25 ते 50 घरांमध्ये पाणी शिरल्याचे मनसे तालुका उपाध्यक्ष दामोदर वारकर यांची विहिर य चव्हाण यांनी सांगितले. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या भागात ओढे, नाले खळखळून वाहिल्याचे दिसले. सखल भागात पाणी साठले आहे. काही ठिकाणी जमीन वाहिली आहे. खोपडी येथे नुकसानीची पाहणी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व ग्रामस्थांनी केली. शेतांचे बांध व रस्ते फुटून नुकसान झाल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हतबल झाल्याची बिकट अवस्था दिसत आहे.
हे ही वाचा :