कौतुकास्पद !! वडापाव विक्रेत्याची मुलगी झाली पीएसआय | पुढारी

कौतुकास्पद !! वडापाव विक्रेत्याची मुलगी झाली पीएसआय

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील तोफखाना परिसरातील पद्मा वडापाव सेंटर चालकाच्या मुलीने यशाचे शिखर गाठत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे पाहायला मिळत आहे, कोरोना काळात सगळ काही ठप्प असताना तीच संधी साधत त्या वेळेचा सदुपयोग करत लावण्या देविदास जक्कन या विद्यार्थिनीने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मन लावून अभ्यास करत एमपीएससी परीक्षा देत आज वडापाव विक्रेत्याची मुलगी पीएसआय बनली आहे. तिने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.

व नगर शहरातील पद्मसाळी समाजाचा नावलौकिक मिळवला आहे, तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे, लावण्या जक्कन ही एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तरी विद्यार्थ्यांनी लावण्याचा आदर्श घेत शिक्षण क्षेत्रात वाटचाल करावी, आता करियर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे, तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळावे, लावण्या जक्कन हिचे यश वाखण्याजोगे असून तीने शासकीय सेवेत  सेवा करत असताना आपल्या शहराचे व देशाचा गौरव होईल असे कार्य करावे अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी लावण्या जक्कन हिला शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत पीएसआय बनलेल्या लावण्या जक्कन हिचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी प्रा. अरविंद शिंदे, देविदास जक्कन, हरिभाऊ येलदंडी आदी उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना लावण्या जक्कन हिने सांगितले की, कोरोना संकट काळात ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून 2020 ची चझडउ परीक्षा दिली, त्याचा नुकताच निकाल जाहीर झाला असून मी पीएसआय पदासाठी पात्र ठरले, आमदार संग्राम जगताप यांनी माझा सत्कार करत कौतुक केले. तसेच मी माझ्या आईं वडिलांच्या कष्टाचे चीज केले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे तिने सांगितले.

हे ही वाचा : 

नगर : राहुरी राष्ट्रवादीचा शरद पवारांनाच पाठिंबा

पुणे : शिक्षणसंस्था होणार संशोधन केंद्रे; विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे

Back to top button