नगर : राहुरी राष्ट्रवादीचा शरद पवारांनाच पाठिंबा | पुढारी

नगर : राहुरी राष्ट्रवादीचा शरद पवारांनाच पाठिंबा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरीत राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्याचे जगजाहीर झाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व आ.अजित पवार यांच्यात निर्माण झालेल्या दोन गटामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार हेच आपले नेते असल्याचे सांगत सत्तेपेक्षा पक्षनिष्ठा जोपासण्याचा निर्णय जाहिर केला. त्यास राहुरी तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ देत आम्ही शरद पवारांसोबत असल्याचे जाहिर केले. पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत यश मिळविलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासन काळात सहा खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळताना सर्वांचेच लक्ष वेधले होते.

परदेशात शिक्षण घेतलेले राज्यमंत्री तनपुरे यांनी आपल्या शिक्षणाची कसब लावत राज्यात कोरोना कालखंडातील समस्यांवर मात केली. तसेच उर्जा खात्यामध्ये शेती व व्यापार्‍यांना लाभदायी ठरणारे उर्जा धोरण आखले. सत्ता गेल्यानंतरही आमदार तनपुरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी कार्य सुरूच ठेवले. गेल्या रविवारी अचानक घडामोडी घडल्या. शिंदे-फडणवीस शासनाच्या सत्तेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेत सहभागी होणार नसल्याचे जाहिर कळताच राष्ट्रवादीचे खासदार, आमदार व कार्यकर्त्यांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला. कोणी मोठ्या साहेबांसोबत तर कोण अजितदादांसोबत अशी राष्ट्रवादी स्पर्धा निर्माण झाली. परंतु आमदार तनपुरे यांनी एकच शब्द देत राहुरी शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादीच्या बैठकीला आमदार तनपुरे यांच्या समवेत तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, प्रशांत नवले, ओबीसी सेलचे महेश उदावंत, सुनिल मोरे, संदिप पानसंबळ, बापुराव कोबरणे, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब खुळे, सुरेशराव निमसे, श्रीकांत बाचकर, नितिन बाफना, किसन जवरे आदींसह अनेकांनी शरद पवार यांच्या सभेला उपस्थिती देत राहुरीकर निष्ठा जपणार असल्याचे जाहिर केले. दरम्यान, आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार निलेश लंके यांचे समर्थक स्व. शिवाजीराजे गाडे गटाचे धनराज गाडे यांची चांगलीच गोची झाली आहे. दोन्ही नेते दोन दिशेला गेल्याने आपण राष्ट्रवादीमध्ये सद्यस्थितीला तटस्थ आहेत.

हे ही वाचा : 

Salaar Teaser : केजीएफ अंदाजात प्रभास-पृथ्वीराज, जोरदार ॲक्शन मोडमधील लूक

राज्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

Back to top button