श्रीगोंदा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : संविधानावर चाललेल्या भारत देशात हिंदू धर्माच्या विरोधात षड्यंत्र रचले जात असल्याने, सर्वांनी हिंदू समाजासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. श्रीगोंदा येथील अवैध कत्तलखाने कायमचे बंद करावेत, राज्यात धर्मांतरबंदी कायदा व्हावा, काष्टी येथील धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी बुधवारी (दि. 5) आमदार राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बस स्थानक ते श्रीगोंदा तहसील कार्यालयापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता.
आमदार राणे म्हणाले, जातीयवाद्यांना देशाचे संविधान मान्य नसून, त्यांना येणार्या काळात सीरियाच्या नियमानुसार राज्य करावयाचे आहे. देशातील लव जिहाद सारख्या गंभीर घटना घडत आहेत. मात्र, आता यापुढे हे सहन केले जाणार नाही. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले असल्याचे सांगत, तालुक्यात सुरू असलेले अनधिकृत कत्तलखाने बंद करा. यापुढे कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा राणे यांनी दिला.
यावेळी आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रताप पाचपुते, संदीप नागवडे, दिनकर पंदरकर, अशोक खेंडके, बापू गोरे, कालिदास कोथिंबीरे आदी उपस्थित होते. शिवाजी साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. आमदार बबनराव पाचपुते यांनी आभार मानले.
हे ही वाचा :