राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गट व भाजपाची युती आणि आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा सरकारला पाठिंबा असे राजकीय चित्र जनतेने पाहिले. त्यामुळे लोकप्रतिनिधी मतदारांचा आदर न करता सत्तेसाठी युती-आघाडी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मनसेने फलकबाजी करत 'अजूनही वेळ गेली नाही, पुन्हा एकदा राज ठाकरे यांना आजमावून बघा' या आशयाचे फलक शहरात लावले आहेत.

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे एकेकाळी देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राची दैना झाली आहे. जनता आता ह्या सर्व प्रकारास विटली असून २०१२ ते २०१७ दरम्यान, नाशिक मनपातील सत्ताधारी मनसेच्या विकास कामांना लक्षात ठेवून जनता पुन्हा एकदा मनसेकडे आकर्षित होत असल्याचा दावा मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष दिलीप दातीर, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी केला आहे. जनतेने सर्व राजकीय पक्षांना आजमावून बघितले आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अनंत सांगळे, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, संतोष कोरडे, विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे, धीरज भोसले, नितीन माळी, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news