कोल्हार बसस्थानकाचे केले नुतनीकरण | पुढारी

कोल्हार बसस्थानकाचे केले नुतनीकरण

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहाता तालुक्यातील कोल्हार येथील बसस्थानकाचे लोकसहभागातून नुतणीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे 1 कोटी रुपये खर्च करून 1 हजार दोनशे स्क्वेअर मीटर मध्ये बारा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर व्यापारी गाळे व बस स्थानक उभारण्यात आले. या बस स्थानकाची अलीकडील काळात खूपच दुरवस्था होऊन अनेक समस्यांचे हे बस स्थानक आगार बनले होते. स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत दैनिक ‘पुढारी’ ने वृत्त प्रसिध्द केले होते.

श्रीरामपूरचे आगार व्यवस्थापक महेश कासार यांनी तातडीने कोल्हार येथे येऊन या बस स्थानकातील समस्यांची पाहणी करून कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांची भेट घेऊन बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत बाबत चर्चा केली. अ‍ॅड. खर्डे यांनी लोकसहभागातून या बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याबाबत आगार प्रमुख महेश कासार यांना शब्द दिला आणि त्याबाबत कृतिशील पावले उचलली. बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी लोकसभागातून सुरुवातही केली आणि पंधरा दिवसातच दुरावस्था झालेल्या या बस स्थानकाचे रूप पालटले. या कामासाठी श्रीरामपूर येथील उद्योजक अविनाश कुदळे यांनी देखील सहभाग नोंदवून सहकार्य केले.

लोकसहभागातूनच नुकतेच या बस स्थानकाचे रंगकाम पूर्ण झाले आहे तर श्रीरामपूरचे आगार प्रमुख महेश कासार यांनी नगरच्या विभागीय कार्यालयाकडे बस स्थानकाच्या स्वच्छतागृहासाठी पाण्याची व्यवस्था, बस स्थानकाच्या आवारातील डांबरीकरण, मुरूम टाकने, लाईटचे काम, वाहतूक नियंत्रकाची केबिन दुरुस्तीचे काम बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था आदी बाबीची मागणी केली आहे. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी महामंडळ स्वच्छता अभियानांतर्गत लवकरच एसटी महामंडळ व लोकसहभागातून या बस स्थानकात सर्व सुखसुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

राहुरी बसस्थानकाचेही काम होणार

दैनिक ‘पुढारी’ ने या बस स्थानकाच्या दुरावस्था व समस्येबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधल्याबद्दल दैनिक ‘पुढारी’ ला कोल्हारकर नागरिकांनी विशेष धन्यवाद दिले आहे. बसस्थानक स्वच्छता अभियान अंतर्गत बाभळेश्वर, बेलापूर, राहुरी या ठिकाणच्या बस स्थानकाचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख महेश कासार यांनी सांगितले.

हेही वाचा

टाकळीभान : रात्रीतून अनेक ठिकाणी चोर्‍या; मंदिराची दानपेटी फोडली

श्रीगोंदा : कार-टॅ्रक्टर अपघातात चालकाचा मृत्यू

कुकाणा : हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

Back to top button