पाथर्डी : डोक्यात कोयता घालून पतीकडून पत्नीची हत्या | पुढारी

पाथर्डी : डोक्यात कोयता घालून पतीकडून पत्नीची हत्या

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील जोडमोहज येथे पतीने पत्नीची डोक्यात कोयता घालून हत्या केली. ही घटना रविवारी घडली. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनुसया यशवंत वाघमारे असे मृत महिलेचे नाव आहे. तर, यशवंत वाघमारे (रा. अलिबाग) असे पतीचे नाव आहे. हे जोडपे आदिवासी समाजाचे असून, मांडवे येथील मोहन हरिभाऊ पवार या व्यापार्‍याकडे काम करत आहेत. जोडमोहज गावात कोळसा तयार करण्यासाठी मजूर म्हणून ते काम करत होते.

या ठिकाणीच ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी धाव घेतली. शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकार्‍यांना तपासाच्या सूचना दिल्या. आरोपी वाघमारे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

हे ही वाचा : 

पक्ष फुटला तरीही आम्ही लढत राहणार : रोहित पवार 

मी जनतेच्या मनात; अजित पवार यांच्या बंडानंतर आमदार राजेश नवघरे यांची भूमिका

 

Back to top button