मी जनतेच्या मनात; अजित पवार यांच्या बंडानंतर आमदार राजेश नवघरे यांची भूमिका | पुढारी

मी जनतेच्या मनात; अजित पवार यांच्या बंडानंतर आमदार राजेश नवघरे यांची भूमिका

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीच्या मोठ्या घडामोडी बाबत आपल्याला तसूवरही कल्पना नव्हती रविवारी बैठकीला या असा आदेश मिळाला आणि मुंबईला आलो त्यानंतर राजभवनात नेण्यात आले. मी सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आहे, अशी प्रतिक्रिया वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी व्यक्त केली. वसमत विधानसभा मतदारसंघाचे राजेश नवघरे हे आमदार आहेत. आमदार नवघरे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यापूर्वी पहाटेच्या शपथविधीच्या वेळी राजेश नवघरे यांचा भ्रमणध्वनी अचानक बंद होता. त्यामुळे ते अजित पवार यांच्यासोबत सोबत गेले असावे, असे बोलले जात होते. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये ही त्यांनी सावध भूमिका घेतली.

दरम्यान आजच्या राजकीय भूकंपाबाबत बोलताना आमदार नवघरे म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल याबाबत व्यक्तींचीतही कल्पना नव्हती. काल रात्री बैठक असल्याचा निरोप मिळाला आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबईला पोहोचलो मुंबई येथे अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत सर्वच आमदारांची बैठक होती. यावेळी सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर काही वेळातच राजभवनामध्ये येण्याचा संदेश मिळाला आणि सर्वच आमदार त्या ठिकाणी गेलो. आपण कुठल्याही गट तटामध्ये न पडता सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात वरिष्ठ नेत्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचंलत का?

Back to top button