पारनेर : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अडसूळ बिनविरोध | पुढारी

पारनेर : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अडसूळ बिनविरोध

पारनेर (नगर)  : पुढारी वृत्तसेवा :  पारनेरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडून शिवसेनेचे नगरसेवक, खासदार डॉ. सुजय विखे यांचे समर्थक युवराज पठारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन अडसूळ यांची नगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यावेळी युवराज पठारे म्हणाले, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी आपण माघार घेत आहोत. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचे सहा नगरसेवक, भाजपचे एक नगरसेवक व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी व इतर काही नगरसेवक माझ्यासोबत होते.

त्यांच्यांच आग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातील अनेक जण सोबत होते. मात्र, रातीतून घोडेबाजार व समोरच्या नेतृत्वाची दादागिरी, प्रशासनाचा दबाव, यामुळे अनेक नगरसेवक आमच्यापासून दुरावले. आताही त्यांच्याशी संपर्क आहे. आम्ही तुमच्या सोबत आहेत, असे ते सांगत आहेत. परंतु आता ती वेळ नाही. घोडेबाजार करून विरोधकांनी त्यांना जवळ केल्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आम्ही विखे कुटुंबाशी एकनिष्ठ असलो तरी त्यांनी आम्हाला अर्ज भरण्यास अगर मागे घेण्याच्या सूचना केल्या नव्हत्या. नगरपंचायत निवडणुकीत कोणताही हस्तक्षेप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला नसल्याचे नगरसेवक पठारे यांनी सांगितले.

हे ही वाचा :

नगर : पुरवठा निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

पुणे : सहकाराला केंद्रातून बळ ! अधिकार्‍यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या दिल्याची ओरड

Back to top button