नगर : वेटरचा खून करणारा दुसरा वेटर जेरबंद ; सुपा येथील घटना

नगर : वेटरचा खून करणारा दुसरा वेटर जेरबंद ; सुपा येथील घटना
Published on
Updated on

सुपा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  दारूच्या नशेत हॉटेलमधील वेटरच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून त्याचा खून करणार्‍या, दुसर्‍या वेटरला सुपा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेपासून तो पसार झालेला होता. केवळ मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली आहे. खंडू रघुनाथ औटी (वय 24, रा.पाडळी आळे, ता. पारनेर) असे मृताचे, तर प्रवीण पुंडलिक गोलाईत (वय 34, रा.म्हशीकोठा, ता.सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. सुपा येथील शासकीय विश्रामगृहाजवळ ओढ्यात 23 जून रोजी सकाळी पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळला होता. मृताच्या खिशात कुठल्याही प्रकारची ओळख पटविणारी गोष्ट नसल्याने पोलिसांना शोध घेण्यासाठी फार अडचणी आल्या. नंतर पोलिसांच्या चौकशीत मयत हा सुपा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत असल्याचे समजले. त्याचे नाव समजल्यानंतर त्याचा फोटो घेऊन पोलिस नातेवाईकाकडे पोहोचले. नातेवाईकांनी तो 18 जूनपासून घरात नसल्याचे सांगितले.

मयत सुप्यातील ज्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता, त्या मालकाकडे जाऊन पोलिसांनी माहिती घेतली. या घटनेपासून अजून एक वेटर त्या दिवसापासून कामावर आला नसल्याचे मालकाने सांगितले. त्याचा पत्ता माहीत नसतानाही तिसर्‍या वेटरकडून त्याचा मोबाईल नंबर घेऊन पोलिसांनी लोकेशननुसार प्रवीण गोलाईत याला ताब्यात घेतले. तो खोटे नाव सांगून दुसर्‍या हॉटेलमध्ये काम करत होता. त्याने दारूच्या नशेत औटी याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून खून केल्याची कबुली दिली आहे. सुपा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक तुळशीराम पवार, अख्तर पठाण, पोलिस नाईक संदीप पवार, यशवंत ठोंबरे, संदीप चौधरी, खंडेराव शिंदे यांनी या गुन्ह्याची उकल केली.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news