जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष : बाळासाहेब थोरात | पुढारी

जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष : बाळासाहेब थोरात

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: सध्या राज्यात आलेले सरकार हे लोकशाहीला मान्य नाही. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या सरकारच्या येण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. बेकायदेशीर आलेले सरकार टिकले असले, तरी जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड असंतोष असल्याची टीका असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यात आलेले सरकार हे लोकशाहीला मान्य नाही. या सरकारच्या येण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ताशेरे ओढली आहे. हे सरकार विकासाच्या मुद्द्यावर मते मागू शकत नाही म्हणून सध्या सर्वत्र जाहिरातबाजी केली जात आहे. जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल असे होणार नाही .वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकार मात्र फक्त जाहिरातबाजीमध्ये व्यस्त आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात. यावरून या सरकारमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास नाही.कितीही जाहिरातबाजी केली असली तरी येणाऱ्या लोकसभा व विधानसभामधून जनता आपले सरकार विरोधी मत व्यक्त करेल, असे सांगताना सध्याच्या सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करणे सोपे नाही. कारण 40 आमदारांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणे अवघड असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

शिर्डीत तब्बल 12 टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद !

रुईछत्तीशी : आरोग्य केंद्र बनले तक्रार केंद्र; रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय

जुनी नगर वाट रस्ता दुरुस्ती करा; जेऊरमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल

 

Back to top button