शिर्डीत तब्बल 12 टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद !

शिर्डीत तब्बल 12 टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद !

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांचा महासागर लोटला असताना शिर्डीतही हजारो भाविक आज साईबाबांच्या चरणी लीन झाले. साईबाबा पांडुरंगाच्या रूपात दर्शन देतात हीच श्रद्धा मनी बाळगून शिर्डीत भाविकांची गर्दी झाली होती. या भाविकांसाठी आज साईबाबा संस्थानातर्फे साबुदान्याच्या तब्बल बारा टन खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर साईसमाधीचे दर्शन झाल्यानंतर अनेक भाविकांनी साईंच्या खिचडी प्रसादाचा लाभ घेतला. साईंच्या साबुदाना खिचडीचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. या दिवशीचा प्रसाद हा भाविकांसाठी पर्वणी आहे.

साई संस्थानाच्या माध्यमातून भाविकांना दिल्या जाणार्‍या या महाप्रसादमध्ये 6 हजार किलो साबुदाना, 5 हजार किलो शेंगदाणे, 2 हजार किलो बटाटा, यासह डालडा, मिरची पावडर व साखर ई. पदार्थ एकत्र करून तब्बल 12 टन साबुदाना खिचडीचा प्रसाद बनविण्यात आला होता. शेंगदाण्याचे झिरके, साबुदाना खिचडी, भगरीचा शिरा, बटाट्याची चटणी, दही हेसर्व पदार्थ भाविकांना आश्चर्यचकित करत होते.

कारण एरव्ही भाजी, चपाती वरण भात हे प्रसादालयात मिळत असते, तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या ताटात हा प्रसाद पाहून व त्याचा आस्वाद घेऊन शिर्डी माझे पंढरपूर या आरतीचा प्रत्यय आला. दिवसभर पन्नास हजारांहून जास्त भाविकांनी खिचडीचा लाभ घेतला. प्रत्येकाला पोटभर खिचडीचा प्रसाद देताना साई संस्थानाने केलेले उत्कृष्ट नियोजन व आयोजन पाहून अनेकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news