म्हैसगाव सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक अपात्र | पुढारी

म्हैसगाव सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक अपात्र

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्षासह विद्यमान 5 संचालक व 25 सभासदांच्या नावे क्षेत्र नसल्याच्या कारणास्तव संस्थेचे सदस्यत्व रद्दबातल करण्यात आल्याचा आदेश सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांनी दिला आहे. विद्यमान अध्यक्ष व पाच संचालकांचे पद रद्द करीत त्यांचे सदस्यत्व काढून घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

म्हैसगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तू केशव गागरे, संचालक विलास भागवत गागरे, नानासाहेब खंडेराय देशमुख, सुनिता महादू हुलूळे, दादा दगडू दाते यांसह 25 जणांना म्हैसगाव सेवा संस्थेमध्ये अपात्र ठरवित संचालकांचे पद व सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश सहायक निबंधक नागरगोजे यांनी दिला. तक्रारदार शिवाजी मुसळे यांनी संस्थेचे अध्यक्ष, संचालक व सभासद हे पात्र नसतानाही संस्थेचा कारभार पाहत असून त्यांनी संस्थेचे अधिनियम पायदळी तुडविल्याची तक्रार दिली होती.

विभागिय सहायक निबंधक संस्था, नाशिक विभाग यांच्या दालनात सुनावणी सुरू होती. यांच्या आदेशानुसार म्हैसगाव सेवा संस्थेची तक्रारीबाबत राहुरीचे सहायक निबंधक कार्यालयात सुनावणी झाली. दोन्हीकडील युक्तीवाद समजून घेतल्यानंतर निबंधक नागरगोजे यांनी अध्यक्ष दत्तू गागरे व त्यांचे चार संचालक, तसेच यमुना कणसे, संगिता गवळी, गोमाजी गांडाळ, देमा गांडाळ, बाजीराव गांडाळ, भारत गांडाळ, अशोक गागरे, मंगल गागरे, वंदना गागरे, वनिता गागरे, दिलीप झावरे, जयरात दाते, तुकाराम दाते, खंडेराव देशमुख, घनश्याम देशमुख, रविंद्र देशमुख, शशिकांत देशमुख, अंबादास बर्डे, सुनिता माने, गवराज हुलुळे, रेवजी हुलुळे, काशिनाथ केसू, पुष्पलता जाधव, लक्ष्मण केदार, बापू दाते, सुनिता गागरे असे 30 जणांना सेवा संस्थेतून अपात्र ठरवित त्याची अंमजबजावणी तातडीने करण्याचे आदेश जारी केले आहे. तसेच संबंधित सभासदांना 23 लक्ष 98 हजार 263 रूपयांचे कर्ज वितरीत केले होते. संबंधित कर्ज व्याजासह वसूल करीत तसा अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.

कर्ज वसुलीसह कामकाजाची चौकशी करा

सत्ताधार्‍यांनी मनमानी करीत सहकार अधिनियम पायदळी तुडविले. अर्हता नसलेले व कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना सभासदत्व प्रदान केले. त्यामुळे सर्वसामान्य, आदिवासी बांधवांवर अन्याय होऊन संचालकाच्या मर्जीतल्या व्यक्तींनाच कर्ज वाटप झाले. संस्थेचे 24 लाखाचे कर्ज वसूल होऊन कामकाजाची चौकशी करावी. कर्ज वसूल होत नसल्यास संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेचा लिलाव करावा व संस्था उर्जितावस्थेत आणावी अशी मागणी शिवाजी गागरे यांनी केली आहे.

हेही वाचा

नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आयोजित ऑलिम्पिक सप्ताहास प्रारंभ

संगमनेर : पांडुरंगा, पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे : आ. बाळासाहेब थोरात

नगर-मनमाड रस्त्याचे अर्धवट काम ठरतेय मृत्यूचा सापळा

Back to top button