संगमनेर : पांडुरंगा, पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : पांडुरंगा, पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संत वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व समतेचा संदेश देणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाला मोठी संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असून महाराष्ट्रात सुख-समृद्धी व बंधुभाव नांदु दे आणि चालू वर्षी भरपूर पाऊस पडू न शेतकरी सुखी होऊ दे, असे साकडे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंगाला घातले. संगमनेर शहरातील चैतन्यनगर येथील विठ्ठल मंदिरात आ. बाळासाहेब थोरात यांनी विठ्ठल रुखमाईंचे दर्शन घेऊन पूजा केली. समवेत विठ्ठल मंदिराचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज, किशोर टोकसे, विश्वास मुर्तडक, गजेंद्र अभंग, चंद्रकांत देशमुख, प्रशांत वामन, वैष्णव मुर्तडक, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्रात भक्ती भावाने साजरा केला जातो. मानवतेचा संदेश देणार्‍या वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत रोहिदास, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत सावता माळी, अशी मोठी संतांची परंपरा लाभली आहे. सर्व समाजातील संतांनी समाजाला मानवतेचा व समतेचा संदेश दिला आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

नगर-मनमाड रस्त्याचे अर्धवट काम ठरतेय मृत्यूचा सापळा

आश्वी : डोळ्यात मिरची पूड टाकून सोनाराला लुटले

चार हजार वारकर्‍यांची आरोग्यदूतांकडून तपासणी

Back to top button