संगमनेर : 43 जनावरांची कत्तलीपासून मुक्तता; पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई | पुढारी

संगमनेर : 43 जनावरांची कत्तलीपासून मुक्तता; पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई

संगमनेर/श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संगमनेर व श्रीरामपूर शहर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आलेल्या सुमारे 43 जनावरांची मुक्तता केली. संगमनेर येथे पोलिस व बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांच्या मदतीने खांजापूर (कुरण) शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकत कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या सुमारे 1 लाख 32 हजार रुपये किंमतीच्या 32 गोवंश जनावरांची कत्तलीतून मुक्ताता केली. तर श्रीरामपुर येथील वार्ड नं. 2 मधून 7 लाख रुपये किमतीच्या 11 जनावरांची मुक्ततता केली.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा सुरू असतानाही संगमनेरमध्ये राजेरोसपणे गोवंश जनावरांची कत्तल केली जात आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे बकरी ईदला कुर्बानी देऊ नये, असे असे ठरलेले असताना संगमनेर तालुक्यातील कुरण (खांजापूर )शिवारात कत्तल करण्याच्या उद्देशाने काही गोवंश जनावरे आणली असल्याची मुक्त माहिती खबर्‍या मार्फत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर चांगलीच ही माहिती बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, विशाल वाकचौरे आणि प्रशांत बेल्हेकर यांनी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पो. नि. भगवान मथुरे यांना दिली.

घटनेची माहिती समजतात शहराचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी पोलिस पथकासह कुरण (खांजापुर) या ठिकाणी जावून छापा टाकला असता कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरे बांधून ठेवणारा मात्र घटना स्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी एका निर्जनस्थळी निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या सर्व गोवंश जनावरांची सुटका करून ती सर्व जनावरे गोशाळेत नेऊन सोडण्यात आले. यावेळी पोलिसांनी एक दुचाकीही जप्त केली आहे. श्रीरामपूर शहरातील वार्ड न. 2 येथे कत्तलीच्या उद्देशाने जनावरे बांधून ठेवण्यात आल्याचे कळाले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी जनावरे बांधलेल्या स्थितीत आढळून आली.

आरोपींनी दिल्या पोलिसांच्या हातावर तुर्‍या

आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर संगमनेर तसेच श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई केली. परंतु याा दोन्ही ठिकाणी पोलिसांना आरोपी मिळून आलेले नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

 हेही वाचा

श्री जवळेश्वराची रथयात्रा आजपासून; गुरूपौर्णिमेपर्यंत पाच दिवस उत्सव

कोळपेवाडी : शांताबाईंच्या डोळ्यांचे ऑपरेशन करू : पुष्पाताई काळे

नाशिक : आयुक्तांशी चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी माघारी, मोर्चा स्थगित

Back to top button