

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर येथे रविवारी 2 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (शिवाजीराव पाटील प्रणित) वतीने राज्यस्तरीय महामंडळ अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी हजारोच्या संख्येने या अधिवेशनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते रविवारी सकाळी महामंडळ अधिवेशनाचे उद्घघाटन होणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अनेक आमदार तसेच राज्याचे शिक्षक नेते माधवराव पाटील, राजाराम वरुटे, बाळासाहेब काळे, राज्याध्यक्ष केशवराव जाधव, कोषाध्यक्ष संभाजी बापट यावेळी उपस्थित राहणार आहेत.
जुनी पेन्शन योजना लागु करणे, केंदप्रमुख विस्तार अधिकारी पदोन्नती तातडीने करणे, वरीष्ठ व निवड श्रेणी मंजूर करणे, सेवानिवृत्तांच्या थकीत रकमेसाठी निधी उपलब्ध करून देणे, जिल्हांतर्गत बदल्यांच्या नवीन धोरणाबाबत भूमिका निश्चित करणे मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, ऑनलाईन माहित्यां कमी करणे आदिसह 17 मागण्याबाबत या महामंडळात चर्चा करून ठराव घेतले जाणार आहेत.
तरी नगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या महामंडळाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, भास्कर कराळे, नवनाथ तोडमल, रविंद्र पिंपळे, ज्ञानेश्वर माळवे, नारायण राऊत, बबन गाडेकर, गजानन ढवळे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र कुदनर, पांडुरंग काळे, संतोष दळे, कल्याण शिंदे गहीनीनाथ शिरसाठ, संतोष गायकवाड, बाबा आव्हाड, बाळकृष्ण कंठाळी, चंद्रकांत मोरे, कैलास वर्पे, महादेव गांगर्डे आदी शिक्षक बांधवांनी केले आहे.
हेही वाचा