पाथडी तालुका : दरोड्यातील आरोपींना अटक करा | पुढारी

पाथडी तालुका : दरोड्यातील आरोपींना अटक करा

पाथडी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बलदवा परिवाराच्या घरावर दरोडा टाकून दोन जणांचा खून करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पाथर्डी तालुका माहेश्वरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी माहेश्वरी श्रीराम ट्रस्टचे अध्यक्ष संदीप बाहेती, अविनाश मंत्री, सचिन बजाज, संदीप मंत्री, रामनाथ बंग, श्रीकांत जाजू, डॉ विलास बाहेती, अशोक मंत्री, जगदीश डागा, मुकुंद लोहिया, बद्रिनारायण पलोड, कमलेश बांगड, सोमनाथ पलोड, संतोष बाहेती, गणेश गटाणी, ओम डागा, गोपाल हारकुट, जगदीश लोहिया आदी उपस्थित होते.

शेवगाव येथील दरोडा व खुनाची घटना जिल्ह्यासह राज्याला सुन्न करणारी आहे. दरोडेखोरांनी गोपीकिसन बलदवा व पुष्पाताई बलदवा यांचा खून केला. सुनिता बलदवा यांना गंभीर जखमी केले. शेवगाव शहरातील भरवस्तीत ही घटना घडली. या दरोडेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे दिसून येत आहे. दरोड्यामुळे पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे. पोलिसांची कोणतीही भीती गुन्हेगारांना राहिलेले नाही. भरवस्तीत जाऊन गुन्हे करण्याचे धाडस होणे हे अत्यंत चिंताजनक आहे. या प्रश्नामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा

पुणे : पालिकेच्या तक्रारींना पोलिसांचा ठेंगा ; गुन्हे दाखल करण्यासाठी होते टाळाटाळ

Monsoon Update Live: येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण देश व्यापरणार; देश अन् राज्याच्या राजधानीत एकाचवेळी बरसणार

पुणे : कात्रज घाटात आढळला रानगवा

Back to top button