अहमदनगर : भागानगरे हत्याकांड; हुच्चे, बोराटेची पोलिस कोठडीत रवानगी | पुढारी

अहमदनगर : भागानगरे हत्याकांड; हुच्चे, बोराटेची पोलिस कोठडीत रवानगी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ओंकार भागानगरे हत्याकांड प्रकरणी रेकी करून हल्लेखोरांना माहिती पुरविणार्‍या आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. अनिकेत साळुंखे असे त्याचे नाव आहे. गणेश हुच्चे, नंदू बोराटे व अनिकेत साळुंखे या तिघांना शनिवारी (दि.23) न्यायालयात हजर केले असता 27 जूनपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी असलेले हुच्चे व बोराटे या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.22) आवळल्या.

हैद्राबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना दोघांना पुणे रेल्वेस्थानकातून ताब्यात घेतले. तर, संदीप गुडा याच्या मागावर पोलिस आहेत. ओंकार भागानगरे, ओंकार घोलप, शुभम पडोळे यांच्यावर पाळत ठेऊन हल्लेखोरांना माहिती पुरविणार्‍या वैभव हुच्चे (रा.माळीवाडा), सागर गुडा (रा.कल्याण रस्ता), रवी नामदे (रा.भिंगार) या तिघांना एलसीबीने सुरुवातीला अटक केली. त्यानंतर गणेश हुच्चे व नंदू बोराटे या दोघांच्या मुसक्या आवळल्या. हुुच्चे याच्या पानटपरीवर काम करणार्‍या अनिकेेत साळुंखे याला अटक करण्यात आली. आरोपींची संख्या सहा झाली असून, सर्वच आरोपींना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहेत.

तलवारी, दोन दुचाकी जप्त

गणेश हुच्चे व नंदू बोराटे या दोघांनी खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच, दोन मोपेड दुचाकीही जप्त केल्या.

हेही वाचा

केखले येथे गव्यांच्या कळपाने 50 एकर उसाचा पाडला फडशा

भाजपमध्ये जाण्याची आमच्यातील कोणाची इच्छा नाही : सतेज पाटील

मान्सून अखेर बरसला ; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात पावसाच्या सरी

Back to top button