मान्सून अखेर बरसला ; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात पावसाच्या सरी

मान्सून अखेर बरसला ; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात पावसाच्या सरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जूनच्या अखेरच्या टप्प्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी मान्सूनच्या पावसाला प्रारंभ झाल्याने नागरिकांसह शेतकरी सुखावला. जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू असला, तरी आकाशात ढगांची गर्दी असल्याने तापमानाचा पारा एकदम कमी झाला. पुणे शहर आणि उपनगरामध्ये सगळीकडे सकाळपासूनच पावसाचे आगमन झाले. सकाळी फिरावयास बाहेर पडलेले पुणेकर या पावसात चिंब भिजले. दिवसभर रेनकोट परिधान केलेले किंवा छत्री घेऊन पुणेकर घराबाहेर पडले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. धरणांत पाणीसाठा कमी असल्याने पाणीकपातीची भीती पावसाच्या आगमनाने थोडी कमी झाल्याने नागरिक आनंदात होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदले. बारामती, इंदापूर, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, दौंड या तालुक्यांत सायंकाळच्या सुमाराला चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. जूनच्या प्रारंभी पावसाने हुलकावणी दिल्याने धूळवाफेवर केलेली पेरणी वाया गेली होती. अनेक ठिकाणी जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. या पावसाने शेतकर्‍यांचा पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news