पुणे मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदी विजय ढेरे | पुढारी

पुणे मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदी विजय ढेरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे मर्चंन्टस को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये बँकेच्या अध्यक्षपदी पुढील पाच वर्षांसाठी विजय ढेरे आणि उपाध्यक्षपदी सुधीर माधवराव शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ढेरे हे उद्योजक आहेत. त्यांना सहकार क्षेत्राची उत्तम जाण असून, ते दि महाराष्ट्र बँक्स फेडरेशनवर व पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनवर संचालकपदावर कार्यरत आहेत.

त्यांनी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. मर्चंन्टस को-ऑप बँकेच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. दरम्यान, उपाध्यक्षपदी निवड झालेले सुधीर शेळके यांना पुणे जिल्हा मध्यर्वी सहकारी बँकेतील प्रशासकीय सेवेचा 39 वर्षांचा अनुभव आहे. बँकेच्या 12 शाखा कार्यरत असून, गेल्या 13 वर्षांपासून बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के असून, रिझर्व्ह बँकेच्या सक्षम बँकेच्या एफएसड्ब्ल्यू नॉर्म्सच्या सर्व पूर्तता बँकेने केली आहेत.

Back to top button