शेवगावात सशस्त्र दरोडा : दरोडेखोरांच्या हल्यात दोघांचा मृत्यू | पुढारी

शेवगावात सशस्त्र दरोडा : दरोडेखोरांच्या हल्यात दोघांचा मृत्यू

शेवगाव तालुका(अहमदनगर) : शेवगाव शहरात भर वस्तीत भीषण दरोडा पडला असुन दरोडेखोरांच्या हल्यात बलदवा परिवारातील दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. येथील बालाजी मंदिरासमोर भर वस्तीत वास्तव्यास असलेल्या बलदवा यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे ४ वाजणेच्या दरम्यान दरोडा पडला. त्यामध्ये किंमती ऐवज लंपास झाला असुन दरोडेखोरांच्या हल्ल्यात पुष्पाताई बलदवा व गोपीकिसन बलदवा या दिर भावजयीचा मृत्यु झाला तर मयत गोपीकिसन यांच्या पत्नी सुनिता गोपीकिसन बलदवा या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरोडेखोरांनी प्रथम गौरव बलदवा यांच्या घराला बाहेरुण कडी लावली नंतर गोपीकिसन बलदवा यांच्या घरात प्रवेश करताच झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर गजाने प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर चोरी करताना पुष्पाताई जाग्या झाल्याने त्यांनाही जिवेच मारले. या घटनेत तीन चोरटे दुचाकी वाहनावर आल्याचे सिसिटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, परिवीक्षाधीन सहा पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पो. नि. विलास पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

हेही वाचा

मान्सून रत्नागिरीतच, पुढे जाता जाईना ! तळकोकणात 11 दिवस अडखळला

Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

Back to top button