Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई | पुढारी

Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिसांनी शहरात गुटखा विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना पकडून त्यांच्याकडून लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोहंमद साजीद मोहंमद नासीर अन्सारी व मोहंमद दिलशाद इस्लाममुद्दीन मलिक व मोहंमद जुबेर रियासदअली अन्सारी (रा. वडाळागाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयितांना पकडले. त्यापैकी साजीद अन्सारी हा एमएच १५ एचपी ३०४० क्रमांकाच्या दुचाकीवरून गोण्यांमध्ये गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा घेऊन जात होता. त्याच्याकडून पथकाने ४९ हजार १५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याने हा मुद्देमाल संशयित मलिक व अन्सारी यांच्याकडून घेतल्याचे समेार आले. तसेच संशयिताच्या घरातही ४ लाख ४३ हजार ४२९ रुपयांचा साठा आढळला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक उपनिरीक्षक येवाजी महाले, सुरेश माळोदे, हवालदार योगीराज गायकवाड, रामदास भडांगे, संदीप भांड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

कोटपा कायद्यानुसार कारवाई

गुटखा विक्रेत्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. शहरातील १३ पोलिस ठाण्यांसह शहर गुन्हे शाखा युनिटच्या पथकांनी आयुक्तालय हद्दीत बुधवारी (दि. २१) दुपारनंतर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये पोलिसांनी ११३ जणांविरोधात कोटपानुसार कारवाई करीत त्यांच्याकडून ८ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. कारवाई आणखी काही दिवस राबविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button