अहमदनगर : गावठी कट्टा, काडतुसे बाळगणार्‍याला अटक | पुढारी

अहमदनगर : गावठी कट्टा, काडतुसे बाळगणार्‍याला अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणार्‍या एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानासमोरुन अटक केली आहे. सुनिल मच्छिंद्र चव्हाण (वय 40 वर्षे, रा. बाजारतळ, आष्टी जि.बीड) असे आरोपीचे नाव असून, एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा 62 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावठी कट्टा बाळगणार्‍या विरोधात कोतवाली पोलिसांची महिनाभरातील ही दुसरी कारवाई आहे.

माजी खासदार दिलीप गांधी यांच्या घराजवळील आनंदधाम गेट येथे एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर थांबलेला असून त्याच्या कंबरेला गावठी कट्टा असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. गुन्हे शोध पथकाने सापळा रचून एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला एक गावठी कट्टा व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिस शिपाई सोमनाथ राऊत यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.

आरोपीवर बीड जिल्ह्यात गुन्हे

आरोपी सुनील मच्छिंद्र चव्हाण सराईत गुन्हेगार असून, आष्टी पोलिस ठाण्यात (जि.बीड) त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी व अवैध दारू विक्री असे तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच, आरोपी चव्हाण हा गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी गावठी कट्टा जवळ बाळगत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

मोठी बातमी ! दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूर : पंचगंगेने गाठला तळ; लाखो लिटर सांडपाणी थेट नदीत

म्हाडा कोकण मंडळाच्या विरार येथील घरांचे नष्टचर्य संपणार

Back to top button