पुढारी सहकार महापरिषद शनिवारी पुण्यात ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

पुढारी सहकार महापरिषद शनिवारी पुण्यात ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील पतसंस्था चळवळ ही तळागाळापर्यंत रुजली असून, या चळवळीबद्दल सकारात्मक विचारमंथन करण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने येत्या शनिवारी (दि. 24) पुण्यात पुढारी सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पुणे आणि अहमदनगरमधील सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट सोसायट्यांचा सक्रिय सहभाग राहणार असून, या चळवळीला अधिक सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. ही चळवळ राज्यातील छोट्या-मोठ्या पतसंस्था, मल्टिस्टेट सोसायट्यांसाठी अधिक सक्षमपणे काम करताना नक्कीच दिशादर्शक ठरेल.

पुढारी सहकार महापरिषदेचे मुख्य प्रायोजक दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड असून, महापरिषदेस लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी ही पॉवर्ड बाय, डिजिटल पार्टनर गो कॅशलेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सहयोगी प्रायोजक श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी, तर समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव व फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्र राज्य व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी हे सहप्रायोजक आहेत. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील विमाननगर परिसरातील हॉटेल नोवोटेल येथे सकाळी 10 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही महापरिषद होणार आहे.

या महापरिषदेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या वेळी दै. ‘पुढारी’चे चेअरमन योगेश जाधव यांच्यासह दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश वाबळे, सहकार आयुक्त अनिल कवडे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव, गो कॅशलेस इंडिया प्रा. लि.चे चेअरमन कृष्णत चन्ने, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव आणि बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या महापरिषदेत पतसंस्थांना भेडसावणार्‍या अडचणी आणि उपाययोजनांवर ऊहापोह होईल तसेच प्रामुख्याने सहकारी पतसंस्था
चळवळीची सद्य:स्थिती, पतसंस्था व मल्टिस्टेट सोसायट्यांची उत्पन्नवाढ, सहकारी संस्थांना डिजिटलायझेशन-मधील संधी, सहकार कायदा आणि ऑडिट तसेच पतसंस्था व मल्टिस्टेट सोसायट्यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन आदींवर तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त पतसंस्थांनी या महापरिषदेत आपला सहभाग नोंदवावा.

पतसंस्थांनी अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधावा.
– बाळासाहेब नागरगोजे 9850556009
– पृथ्वीराज पाटील 7385331065

हे ही वाचा :

NCP : अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटील विरोधी पक्षनेते होणार

Pankaja Munde And Dhananjay Munde : काळाची पावले ओळखून मुंडे बहीण-भावाचे बेरजेचे राजकारण

 

Back to top button