श्रीरामपूर : जिल्ह्यासाठी भाजप पदाधिकारी विखेंच्या दारी

श्रीरामपूर : जिल्ह्यासाठी भाजप पदाधिकारी विखेंच्या दारी
Published on
Updated on

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले सार्वजनिक बांधकामचे उत्तर विभाग कार्यालय संगमनेर येथून श्रीरामपूर येथे स्थलांतरीत करावे, संगमनेरचे प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रद्द करावे, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे मंजूर करावे, या मागण्यांसह श्रीरामपूरच जिल्हा करावा, या मागणीचे निवेदन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांना जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूर भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह श्रीरामपूरच्या पदाधिकार्‍यांनी दिले.

यावेळी मंत्री विखे यांनी शासन स्तरावर सध्या जिल्हा विभाजनाचा कोणताही विषय नाही. जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना सर्व बाबी तपासून निर्णय होतील, असे स्पष्ट करत शिर्डी जिल्हा होणार नाही, या अफवेची हवा काढून घेतली. सध्या श्रीरामपूरात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा कुटील डाव काही राजकारणी करत असल्याचे परखड मत व्यक्त केले.

श्रीरामपूरची बाजू मांडताना केतन खोरे यांनी जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रशस्त असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहरालगत उपलब्ध शेती महामंडळाची जागा, अतिरिक्त नगर रचना कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, रेल्वे स्थानक, एमआयडीसी, जिल्हा सत्र न्यायालयामुळे पायाभरणी श्रीरामपूर येथे झालेली असल्याची माहीती दिली. दिपक पटारे व मारूती बिंगले यांनी गेल्या 43 वर्षात नव्हे इतकी महत्वपूर्ण महसुल खात्याचा कारभार आपल्याकडे आला असल्याने श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. आपण श्रीरामपूर जिल्ह्याचे सर्वांचे स्वप्न साकार करावे, अशी आग्रही मागणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सुनिल वाणी, माजी नगरसेवक दिपक चव्हाण, मिलींदकुमार साळवे, शंतनू फोफसे, रवी पाटील, नितीन भागडे, विराज भोसले, विठ्ठल राऊत, मंजूषा ढोकचौळे, सुनिल साठे, मनोज नवले, अभिषेक खंडागळे, बंडूकुमार शिंदे, पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास, दत्ता जाधव, रूपेश हरकल, गौतम उपाध्ये, अजित बाबेल, बाबासाहेब साळवे, विजय आखाडे, विशाल यादव, अक्षय वर्पे, नितीन ललवाणी, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, पुरषोत्तम भराटे, ईस्माइल शेख, लहानू नागले, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news