शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहर व तालुक्यातील 42 'ब'अंतर्गत बेकायदेशीर बिनशेती आदेश प्रकरणी सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा. तसेच, तत्काळ वस्तूनिष्ठ अहवाल शासनास न पाठविल्यास 4 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
मुंडे निवेदनात म्हटले, शेवगाव तालुक्यातील 42 'ब'अंतर्गत झालेल्या बेकायदेशीर बिनशेती आदेशाची तक्रार केल्यानंतर आपल्या कार्यालयाकडून शासनाकडे त्या प्रकरणातील दोषी अधिकर्यांचे 1 ते 4 परिशिष्ट पाठविण्यात आले. प्रत्यक्षात तहसीलदार, अपर जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या अहवालमध्ये काही गंभीर स्वरूपाच्या अनियमितता दर्शविण्यात आल्या. काही लपवीण्यात आलेल्या आहेत. कार्यालयातील सांक्षाकित दप्तर गहाळ झाले असताना, त्या ठिकाणी असांक्षाकित नोंदवह्या म्हणजे तपासणी वेळी वरिष्ठ कार्यालयातील अधिकार्यांच्या सहमतीने तयार करण्यात आलेले बनावट दप्तर दाखवविण्यात आले.
काही प्रकरणे कोविड-19च्या गंभीर परिस्थितीमध्ये शासकीय कामकाज बंद असताना आदेशीत करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मागील तारीख असलेल्या कित्येक प्रकरणाच्या नोंदी मंजूर करण्यात आल्याच्या निदर्शनास आले. काही प्रकरणाची डि-फेज चलने निदर्शनास येत नसून अशा अनेक शासनाची फसवणूक केल्याच्या फौजदारी स्वरूपाच्या गोष्टी महसूल शाखेच्या निदर्शनास आलेल्या असताना प्रत्यक्षात दोषी अधिकार्यांचे निष्पक्ष ज्ञापण महसूल शाखेकडून तयार करण्यात आलेले नाही.
याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केल्यानंतर शासनाकडून वस्तूनिष्ठ अहवाल देण्याचे कळविण्यात आले होते. त्या पत्राचे गांभीर्य लक्षात घेता सर्व दोषीवर फौजदारी कारवाई करून वस्तूनिष्ठ अहवाल शासनास पाठविणे आवश्यक होता. तक्रारदाराची प्रत्यक्षात दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा