शिर्डीत रोहित्रावर चढला वेडसर तरुण ! क्रेनने उतरविला खाली; काय आहे प्रकरण? | पुढारी

शिर्डीत रोहित्रावर चढला वेडसर तरुण ! क्रेनने उतरविला खाली; काय आहे प्रकरण?

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शिर्डी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका मुख्य वीज रोहित्रावर एक वेडसर तरुण चढला, मात्र त्या रोहित्राचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले, मात्र तो वेडसर तरुण त्या विजेच्या रोहित्रावरून खाली उतरण्यास तयार नव्हता. तो त्या विजेच्या रोहित्राला खाली उडी घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याने जर उडी फेकली तर तो मरेल, या भीतीने सर्वांचा जीव टांगणीला लागला. अखेर क्रेनच्या साह्याने त्याला विजरोहित्रारावरून खाली उतरविल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शिर्डीतील काकडी विमानतळा कडे जाणार्‍या रस्त्याच्या समोर शहराला वीजपुरवठा करणार्‍या मुख्य विजेच्या रोहित्रावर शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक वेडसर तरुण चढला होता. एका मागे एक असे करीत त्या ठिकाणी अनेक बघ्यांची मोठी गर्दी झाली. सर्व जनता त्याला खाली येण्याचा आग्रह धरीत होती, परंतु तो खाली न येता त्या विजेच्या रोहित्रावर वर- वर चढत होता.

खाली उडी घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र उपस्थितांनी त्याला तेथेच उभे राहण्याची विनंती केली, मात्र तो विजेच्या रोहीत्राच्या या टोकावरून त्या टोकावर चढत होता. तो कुणाचे काही ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे या वेडसर तरुणाला या विजेच्या रोहित्रारावरून खाली कसे उतरावयाचे, या विवंचनेत उपस्थित चांगलेच चक्रावले. शिर्डी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. नंतर क्रेनच्या शिडीने त्याला खाली उतरविले आणि सर्वजन आपापल्या रस्त्याकडे परतले.

हेही वाचा

राहाता : अडकित्ता मारून एकास ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पठ्ठ्याने पदपथावर चढवली पीएमपी बस

पुणतांबा : ‘गणेश’कारखान्यासाठी 89% मतदान

Back to top button