राहाता : अडकित्ता मारून एकास ठार मारण्याचा प्रयत्न | पुढारी

राहाता : अडकित्ता मारून एकास ठार मारण्याचा प्रयत्न

राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : खिशात हात घालण्यास प्रतिकार केल्याने एकाने कैर्‍या फोडण्याचा अडकित्त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने संगम भाऊसाहेब साळवे (वय 18 वर्षे) या युवकाच्या डोक्यात मारून त्यास गंभीर जखमी केले. ही खळबळ जनक घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरात घडली.

पोलिसांना घटना समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी श्रीसाईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून अर्धा तासात गुन्ह्यातील आरोपीस अटक केली. त्याच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी रामा बाळासाहेब यादव यांचा भाचा संगम भाऊसाहेब साळवे (वय 18 वर्षे) हा गुरुवार (दि. 15 जून) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरात सोनार गल्लीतील रुणवाल किराणा दुकानाशेजारी बंद गाळ्यांसमोर बसला होता. तेथे सुरज गायकवाड (वय 20 वर्षे, रा. टाक गल्ली, राहाता) आला. तो साळवेच्या खिशात हात घालू लागला. तेव्हा संगम साळवे व सुरज गायकवाड यांच्यात वाद होऊन आरोपी सुरज गायकवाड याने त्याचे हातातील कैर्‍या फोडण्याचा अडकित्ता संगमच्या डोक्यात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारला.

संगम रक्तबंभाळ अवस्थेत पडला होता. पोलिसांना ही माहिती समजताच स.पो. नि. कैलास वाघ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत संगम यास 108 रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयातून शिर्डी येथे साई संस्थांनच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक होती. घटनेची वार्ता शहरात पसरताच व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

हेही वाचा

पुण्यात दामदुपटीच्या प्रलोभनाने 36 लाखांचा घातला गंडा

पुणतांबा : ‘गणेश’कारखान्यासाठी 89% मतदान

राज्यातील पोलिस प्रशासन नेमके करते तरी काय? : जयंत पाटील

Back to top button