वाळकी : पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला टाळे | पुढारी

वाळकी : पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला टाळे

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील दहिगाव, साकत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर गेल्या तीन वर्षांपासून पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकत आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत आठवड्यातून तीन दिवस पदवीधर शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन शालेय प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दहिगाव येथील प्राथमिक शाळेवर तीन वर्षांपासून संच मान्यतेनुसार दोन पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु शिक्षक बदली प्रक्रियेनुसार रिक्त झालेल्या जागेवर पदवीधर शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. आंदोलन केले. मात्र शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पालक पाल्याला नाईलाजाने खासगी शाळेत टाकत आहे. दहिगाव शाळेतील विद्यार्थी पटसंख्या 200च्या वर आहे.

शिक्षक मिळावेत यासाठी म्हस्के यांनी दि. 10 ऑक्टोबर 2022 पासून दोन दिवस उपोषण केले होते. तसेच दहिगाव ग्रामस्थांनी देखील दोन तीन वेळा पत्रव्यवहार केला. परंतु शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही. परिमामी दहिगाव साकत खुर्द ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या मुख्य गेटला टाळे ठोकले.

या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांनी दहिगाव शाळेवर अनिल कडुस, सुमन पानसंबळ या पदवीधर शिक्षकांना लेखी आदेशानुसार आठवड्यातील तीन दिवस कार्यरत राहावे, तसेच साके बाबासाहेब यांची विषयतज्ज्ञ म्हणून कायमस्वरूपी नेमणूक करून आंदोलनावर मार्ग काढला.

आंदोलनात दहिगावचे माजी सरपंच मधुकर म्हस्के, सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव म्हस्के, उपाध्यक्ष दत्तात्रय बनकर, माजी सरपंच सुनील म्हस्के, किसान पार्टीचे उपाध्यक्ष सुनील म्हस्के, शिराढोणचे उपसरपंच दादा दरेकर, महेश म्हस्के, महादेव म्हस्के, भाऊसाहेब आन्हाड, जालिंदर बनकर, संतोष आन्हाड, अनिल म्हस्के, दीपक वाघ, छगन जरे, बाबासाहेब वाघ, संतोष पोटरे, सचिन पोटरे, बाळासाहेब हंबर्डे, विजय आन्हाड, किरण हिंगे, जावेद शेख, उमेश सावंत, संजय जावळे, शरद निमसे, युवराज पवार, लक्ष्मण कार्ले, विकास हिंगे, नीलेश पोटरे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी हवालदार रमेश गांगर्डे, कदम, वडणे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

अहमदनगरची जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ! राधाकृष्ण विखे पाटील

Ashadhi wari : वारकर्‍यांना मूलभूत सुविधा : विखे पाटील

दहिगाव ने : तिथे रोजच होते बिबट्याचे दर्शन

Back to top button