दहिगाव ने : तिथे रोजच होते बिबट्याचे दर्शन | पुढारी

दहिगाव ने : तिथे रोजच होते बिबट्याचे दर्शन

दहिगाव ने(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील जायकवाडी धरण परिसरातील दहिगाव ने, घेवरी, देवाळणे या गावांच्या शिवारात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. सायंकाळी व रात्री वस्तीवर राहणारे शेतकरी व ग्रामस्थांना रोजच या बिबट्याचे दर्शन होत असल्याने. 2011 मध्ये याच परिसरातील शंकुतला काशिद याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या आठवणी बिबट्याच्या संचाराने पुन्हा ताज्या झाल्याने नागरिक भयभीत झाली आहेत.

घेवरी येथील हरिभाऊ काळे यांच्या शेळीचा व अनिल कसबे, गुलाब कसबे यांच्या कुत्र्याचा या बिबट्याने फडशा पाडला आहे. रात्री ऊस व कपाशीला पाणी भरण्यासाठी गेलेल्या विशाल दळवी, भीमा नन्नवरे, गोरक्ष कमानदार, भाऊसाहेब तांबे, राजू झेंडे, नवनाथ पाचे या शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने दिवसा व रात्री परिसरातील शेतकर्‍याने भीतीपोटी शेतीची कामे बंद केली आहेत. पाऊसही नसल्याने पाण्यावर आलेली पिके पाणी असूनही तहानलेली आहेत.

शेवगाव वन विभागचे वनपाल आर. एम. शिरसाठ, वनसरंक्षक एस. पी. लोढे यांनी भेट देऊन परिसरात बिब़ट्याचा संचार असल्याचे मान्य करत पिंजरा लावला आहे. जायकवाडी परिसरात बिबट्याचा संचार दिवसेदिवस वाढत चालला आहे. वन विभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. बिबट्याच्या संचाराने मोठी अघटित घडना घडू नये यासाठी पिंजर्‍यांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

घेवरी परिसरात एक पिंजरा लावला आहे. नागरिकांनी रात्री घराबाहेर पडताना काठी व बॅटरी वापरावी. बसून व वाकून काम करू नये.

– आर. एम. शिरसाठ,
वनपाल, शेवगाव वनविभाग

2011 सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वन विभागाने पिंजर्‍यांची संख्या वाढवून बिबट्या जेरबंद करावा.

– राजाभाऊ पाऊलबुद्धे,
उपसरपंच, दहिगांव ने

हेही वाचा

नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

अहमदनगरची जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ! राधाकृष्ण विखे पाटील

पुणे रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल सुरू ; ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांना मिळणार दिलासा

Back to top button