Ashadhi wari : विठुरायाच्या गजरात शहरातील वारकरी तल्लीन | पुढारी

Ashadhi wari : विठुरायाच्या गजरात शहरातील वारकरी तल्लीन

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या प्रमाणात वारकरी सद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जात आहेत. पंढरपूरला जाणार्‍या अनेक दिंड्याचे शहरात आगमन होत आहे. नाशिक येथून पंढरपूरला निघालेल्या त्रंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे नगरमध्ये आगमन झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी विठुरायाच्या हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाल्याने परिसर भक्तिमय झाला होता.

महाराष्ट्र संतांची भूमि असून, या संताचे विचार आजच्या पिढीला माहित होणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा वारकरी जपत आहे. आषाढी एकादशीचे खूप महत्व असून, यानिमित्त महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरला पायी दिंडीतून विठुरायाच्या दर्शनाला जातात. पालखीचे दर्शन घेवून मनाला समाधान वाटले, अशी भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी अविनाश घुले, संजय चोपडा, अभिजित खोसे, नीलेश हिंगे, मळू गाडळकर, आदी उपस्थित होते.

हेही वाचा

नेवासा तालुक्यातील देवगड ते पंढरपूर बस सेवा सुरू करा

अमेरिकेतील प्रदर्शनात कोल्हापूरचा वारसा

Back to top button