नेवासा तालुक्यातील देवगड ते पंढरपूर बस सेवा सुरू करा | पुढारी

नेवासा तालुक्यातील देवगड ते पंढरपूर बस सेवा सुरू करा

गेवराई (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील देवगड ते पंढरपूर अशी करोनानंतर बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. देवगड – पंढरपूर बस सेवा 25 वर्षे सुरू होती. त्याचबरोबर लासलगाव-देवगड, पारनेर-देवगड बससेवाही अनेक वर्षे देवगड येथे येत होत्या. मात्र, करोनानंतर या बस सेवा बंद पडल्या आहेत. दोन वर्षे उलटूनही सुरू नसल्याने भविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. देवगड देवस्थाननेही बस पुन्हा सुरू व्हावी म्हणून अनेकवेळा पत्रव्यवहार केला; मात्र अद्याप एसटी विभागाने कुठलीही हलचल केलेली नाही.

पंढरपूर येथे या महिन्यात आषाढी वारी सोहळा होणार असून, नेवासा तालुक्यातून हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात. यात्रा काळात भाविक प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यातून, बसची सोय करावी, त्यामुळे भाविकांची सोय होईल. चालत जाणार्‍या वारकर्‍यांसह वाहनांद्वारे जाणारांची संख्याही लक्षणीय असते. चालत जाऊन दर्शन घेतल्यानंतर परतीचा प्रवास वाहनांद्वारे करण्यात येतो. त्यामुळे अनेकदा बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते. यंदा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर, नेवासा विभागाने नियोजन केले पाहिजे.

हेही वाचा

Ashadhi wari 2023 : बा..विठ्ठला पाऊस पडू दे..! ज्ञानेश्वर महाराज हजारे पांडुरंगाला घालणार साकडे

नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार

Back to top button