अहमदनगर : पोखरणा ज्वेलर्सने नगरकरांचा विश्वास जपला : आ. जगताप | पुढारी

अहमदनगर : पोखरणा ज्वेलर्सने नगरकरांचा विश्वास जपला : आ. जगताप

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सराफ बाजारापासून बाजूला असलेल्या पोखरणा ज्वेलर्स या सराफीपेढीने वेगळेपणाचा ठसा उमटवत अल्पावधीत नगरकरांचा विश्वास संपादन केला. याकरिता अनिल पोखरणा यांनी अथक परिश्रम घेतले, असे गौरवोद्गार आ.संग्राम जगताप यांनी काढले. सर्जेपुरा येथे असलेल्या पोखरणा ज्वेलर्समध्ये आ.संग्राम जगताप यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पोखरणा ज्वेलर्सचे संचालक अनिल पोखरणा म्हणाले, जगताप कुटूंबियांशी आमचा स्नेह आजोबांपासूनचा आहे.

या कार्यक्रमास उपमहापौर गणेश भोसले, मर्चटस् बॅकेचे संचालक आनंदराम मुनोत, संजीव गांधी, संजय बोरा, संजय चोपडा, प्रकाश पोखरणा, अरविंद गुंदेचा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, रामदास आंधळे, वसंत पोखरणा, पेमराज पोखरणा, आकाश पोखरणा, नयन पोखरणा, रमेश सोनी-मंडलेचा, हिरालाल चंगेडिया, रवि गुजराथी, राजेंद्र चोपडा, प्रमोद मुनोत-नेवासकर उपस्थित होते. अमित पोखरणा यांनी आभार मानले.

हेही वाचा

शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा

नगरच्या वारकर्‍यांना मारहाण करणार्‍या पोलिसांना निलंबित करा

अहमदनगर जिल्हा बँकेची आजपासून मोबाईल बँकिंग सेवा

Back to top button