

अहमदनगर; पुढारी वृत्त्तसेवा : अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँकेचे मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आज 15 जुन 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता महाराष्ट्र राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, तथा अहमदनगरचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
अहमदनगर येथील सहकार सभागृहामध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे व्हा.चेअरमन अॅड. माधवराव कानवडे व बँकचे सन्मानीय संचालक हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थितीत राहणार आहेत. तरी या समारंभास बँकेचे सर्व ग्राहक खातेदार व हितचिंतक यासह सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले आहे.
हेही वाचा