शिर्डी संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ | पुढारी

शिर्डी संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी संस्थान मधील आकृतीबंधातील मंजूर पदांवर नियुक्त असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना 40 टक्के वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरवा केला होता. तत्कालीन विधी व न्याय मंत्री असताना 1052 कर्मचार्‍यांना संस्थान सेवेत कायम करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

उर्वरीत कर्मचार्‍यांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्तिगत पाठपुरावा करून मंत्री विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे विधी व न्याय विभागाने शासन आदेश काढत 40 टक्के वेतनवाढ देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे संस्थानला कळविले आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या आकृतीबंधातील कंत्राटी कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा :

दंगलीच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे विशेष पथक

Pudhari Editorial : कूटनीती भारताची, हतबल पाकिस्तान

पुणे : मरावे परि नेत्ररुपी उरावे! नेत्रतज्ज्ञांचे आवाहन

Back to top button