सरकारच्या योजनांचा केवळ दिखावा : आ. कानडे | पुढारी

सरकारच्या योजनांचा केवळ दिखावा : आ. कानडे

श्रीरामपूर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : सरकारच्या योजनांचा केवळ दिखावा केला जात आहे. प्रत्यक्षात कोणतीही योजना ही गरीबांच्या दरापर्यंत पोहचलेली नाही. सरकार केवळ योजनांच्या जाहीरात बाजीवर पैशांची उधळण करीत असल्याचा आरोप आ. लहू कानडे यांनी केला. तालुक्यातील वडाळा, कान्हेगाव येथे नुकतीच ग्रामसंवाद यात्रा पार पडली.

यावेळी ग्रामस्थांना उद्देशून आ. कानडे बोलत होते. आ. कानडे म्हणाले, विकास प्रशासनातील एक अधिकारी म्हणून श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा जेव्हा आढावा घेतला, तेव्हा तालुका स्तरावरील अधिकारी तर सोडाच पण ग्रामपातळीवर काम करणारे ग्रामसेवक किंवा तलाठी देखील कष्ट करणार्‍या शेतकरी व शेतकमजुरांच्या घरापर्यंत गेलेलेच नाहीत आणि केवळ शिबीर आयोजित केल्याचा देखावा निर्माण करुन ‘शासन आपल्या दारी’ ही योजना राबविली जात असल्याचे चित्र उभे केले जात आहे. म्हणूनच मी ही ग्रामसंवाद यात्रा सुरु केली आहे.

प्रशासनाला देखील घरोघर जाऊन शासन दरबारी अडकलेल्या कामांची माहिती घेऊन नंतरच गावोगाव शिबीरे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मी प्रत्येक गावात पुन्हा येईल, अशी माहिती वडाळा महादेव येथील व कान्हेगांव येथील ग्रामसंवादामध्ये आमदार कानडे यांनी दिली. राहुरी तालुक्यातील रामपूर आणि कोल्हार येथील शिबीरामधील सरकारी यंत्रणेचा ढिसाळ कारभार बघून तहसिलदारांना सूचना केल्या आहेत.

हे ही वाचा : 

पुणे : प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणारा रिक्षाचालक जेरबंद

पुणे : तरुणीला गिफ्टचे प्रलोभन पडले तब्बल एवढ्या लाखाला

Back to top button