नगर: सरकारमुळे सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे ठप्प, आमदार प्राजक्त तनपुरे; राहुरी तालुक्यात जनसंवाद अभियान दौरा | पुढारी

नगर: सरकारमुळे सौर ऊर्जा प्रकल्पाची कामे ठप्प, आमदार प्राजक्त तनपुरे; राहुरी तालुक्यात जनसंवाद अभियान दौरा

वळण (नगर), पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडीचे सरकार असते तर आत्तापर्यंत आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन शेतकर्‍यांना 24 तास वीज उपलब्ध झाली असती. परंतु आज जवळजवळ वर्ष होत आले तरी देखील या कामात कुठलीही प्रगती नाही. पंचनामे होऊनही अतिवृष्टीची रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. घोषणाबाजीचे हे सरकार विरोधी बोलणार्‍या आमदार व नेत्यांवर ईडी चौकशीची कारवाई केली जाते. अशा तीव्र भावना माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केल्या.

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, मांजरी व पिंपरी वळण या गावांच्या जनसंवाद अभियान दौर्‍यााप्रसंगी वळण येथील हनुमान मंदिर सभा मंडपात झालेल्या कार्यक्रमात आमदार तनपुरे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोपानराव खिलारी होते. व्यासपीठावर राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, वळणचे सरपंच सुरेश मकासरे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक बाळासाहेब खुळे, मधुकर पवार, सचिन भिंगारदे, पीरखा पठाण, कोंडाजी विटनोर, बापूसाहेब वाघ, मांजरीचे सरपंच जालिंदर आंबेडकर, पर्वत खुळे, बी. आर. खुळे, ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट, रोहिदास आढाव हे उपस्थित होते.

आ. तनपुरे म्हणाले की, मंत्रिपदाचा जो अल्पकाळ मिळाला, त्यात जास्तीत जास्त ऊर्जा खात्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोहित्र उपलब्ध करून दिले व सौर ऊर्जा प्रकल्प योजना राबवली. राहुरी तालुक्यातही ती चार-पाच ठिकाणी ही योजना राबवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात काहींनी जागेचे राजकारण केल्याने एक दोन ठिकाणी सौर उर्जा योजना राबविता आली नाही. तरीही बाभूळगाव, आरडगाव, ववांजुळपोई या ठिकाणचे सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लावल्याने येथील विजेचा सुटला आहे.

हेही वाचा:

नगर: ‘मराठी शाळा’ मोहीम बनली कौतुकाचा विषय, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगत शाळा प्रवेशासाठी घातली भावनिक साद!

नगर: प्रशासन आता ‘दिव्यांगांच्या दारी’ : जिल्हाधिकारी सालीमठ; दिव्यांग व्यक्तींचे गावनिहाय होणार सर्वेक्षण

नगर: केदारेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम

 

Back to top button