कर्जत : पाईपलाईन फोडल्याने चुलत भावावर अॅसिड हल्ला
कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळवाडी येथे पाईपलाईन फोडण्याच्या कारणावरून सख्या चुलत भावाने अॅसिड टाकून भावलाच जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. महिलांवरही कोयता व कुर्हाडीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तब्बल पाचजण जखमी झाले आहे. हल्लेखोरांनी अॅसिड, चटणी,कोयता, कुर्हाड, गजाचा वापर केला. काल (सोमवारी) ही घटना घडली.
किरण बाळासाहेब देवकाते यांनी फिर्यादीमध्ये म्हटले की, कर्जत पिंपळवाडी येथे इनामवस्तीवर देवकाते कुटुंबीय राहते. सामायिक विहीर व रस्त्यावरून दोन चुलत भावांमध्ये काल राडा झाला. पाईपलाईन फोडल्याचे निमित्त होऊन रविवारी रात्री वाद झाला होता. यावेळी किरण देवकाते हा गावात दूध घालण्यासाठी आला असता, त्याला चार-पाच जणांनी भर रस्त्यावर बेदम मारहाण केली यानंतर कर्जत पोलिस ठाण्यात हा वाद मिटविण्यात आला. मात्र, त्यावेळी विशाल देवकाते, बाळासाहेब देवकाते यांनी आमच्या जीवाला धोका आहे, असे सांगितले.
सोमवारी पहाटे अशोक बबन देवकाते, कांतीलाल बबन देवकाते, राजेंद्र बबन देवकाते, शकुंतला अशोक देवकाते, वैशाली कांतीला देवकाते, यश राजेंद्र देवकाते व सौरभ अशोक देवकाते यांनी हल्ला केला. एकाच्या तोंडावर अॅसिड टाकले. महिलांवर कुर्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पाचजण जखमी झाले. या सर्व जखमींना सुभाष देवकाते यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल केले. प्राथमिक उपचार करून या सर्वांना नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा

