पाकिस्तानच्या कैदेतील पालघरच्या सहा मच्छीमारांची सुटका | पुढारी

पाकिस्तानच्या कैदेतील पालघरच्या सहा मच्छीमारांची सुटका

पालघर; पुढारी वृत्तसेवा :  पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या दोनशे मच्छिमारांची दुसरी तुकडी नुकताच मायदेशी परतली. यात गुजरात, दिव, उत्तर प्रदेशातील बिहार आणि महाराष्ट्र राज्यातील मच्छिमार आणि खलाश्यांचा समावेश आहे.

भारतीय समुद्राच्या सीमा भागात मासेमारी करीत असताना अनावधानाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याने पाकिस्तानी सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन तुरुंगात टाकलेल्या भारतीय खलाशी आणि मच्छीमांची सुटका करण्याचे आश्वासन पाकिस्तान देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने गुरुवारी (ता. ०१) दुसऱ्या तुकडीतील २०० भारतीय मच्छीमांची केली आहे. यात पालघर जिल्ह्यातील सहा मच्छीमारांचा समावेश आहे. पाकिस्तानी तुरुंगात ६६६ भारतीय मच्छीमार असल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले होते.

मासेमारी करीत असताना बोटी भरकटल्याने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केल्याने पाकिस्तानी सुरक्षा बलाकडून मच्छिमार आणि खलाश्यांना ताब्यात घेण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातील सुटका झालेल्यांमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. पालघर मधील सरपाडा येथील उमेश बाबू दावत्या, तलासरी तालुक्यातील नवीन सावळा वळवी, राजेश सावळा वळवी, संदीप प्रभू हरपळे, राजेश बाबू वळवी, सुरेश रत्ना हरपळे मिळून सहा मच्छिमारांचा समावेश आहे. तिसऱ्या तुकडीतील शंभर मच्छिमारांची सुटका जुलै महिन्यात (ता. ०३) करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मच्छीमार संघाचे कार्यकारी अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली आहे.

Back to top button