संगमनेरात भगव्या मोर्चाने झाले सर्वत्र भगवे वातावरण; घोषणांनी परिसर दणाणला
संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहादच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संगमनेरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चास सुरूवात झाली आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या हिंदू समाज बंधू-भगिनींच्या घोषणांनी परिसर दणाणला. संगमनेर नगरपालिकेजवळील लाल बहादूर शास्त्री चौकात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास डोक्यावर भगवी टोपी परिधान करून तसेच गळ्यात भगवी शाल घालून, हातात भगवा ध्वज, तरुण एका मागे एक हिंदू समाज आणि भगिनी अवघ्या अर्ध्या तासात हजारोंच्या संख्येने या मोर्च्यात सहभागी झाले.
दरम्यान, सर्वजण "भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गोमाता की जय, लव्ह जिहाद कायदा झालाच पाहिजे, धर्मांतरण विरोधी कायदा झालाच पाहिजे, श्रद्धा झाली साक्षी झाली आता कुणाच नाव" या घोषनांनी संगमनेरकर चांगलेच दणाणून गेले होते. या मोर्चाचा लाल बहादूर शास्त्री चौकातून प्रारंभ झाला आणि पुढे बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेन रोड, चावडी चौक, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक मार्गे हा भगवा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती शहरातील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती तसेच प्रांतधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या नवीन नगर रोड बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आला होता. शहरातील चारही बाजूंनी मोर्चात सहभागी होण्यासाठी तरुणांचे लोंढेचे लोंढे दाखल होत होते. त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झालं होते.
संगमनेर शहरात कडकडीत बंद
शहराततून हिंदू समाज बांधवांचा भगवा मोर्चा निघणार असल्यामुळे सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील विविध गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आणि गावाची गावे या भगव्या मोर्चा सहभागी झाले होते

