संगमनेर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधामास १० वर्षाचा कारावास

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम छगन मच्छिंद्र खेमनर याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तब्बल सात वर्षानंतर १० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांभूळवाडी येथील रहिवासी असणारा छगन मच्छिंद्र खेमनर याने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक केली. शेतात मजुरीसाठी तिला पाठवा असे तिच्या आई-वडिलांना सांगितले.
नात्यातलाच मुलगा असल्यामुळे आई-वडिलांनी त्याच्याबरोबर तिला पाठवले. त्यानंतर खेमनर याने तिला शेतात कामासाठी न नेता तीला थेट एका जंगलात नेले. अन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. आणि हे कोणाला सांगितली तर तुला ठार मारीन अशी धमकी तिला दिली. आणि पुन्हा त्यांनी तिला घरी सोडले.
घरी गेल्यानंतर पडित मुलीने रडत आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आई वडिलांनी मुलीला घेवून थेट घारगाव पोलीस ठाण्यात छगन खेमनरच्या विरोधात तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी छगन खेमनर गुन्हा दाखल केला.
या अत्याचाराचा खटला अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने तब्बल सात वर्षानंतर १० वर्षे सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
-हेही वाचा
महागड्या सोन्याने बिघडविले लग्नाचे बजेट; ५७ हजारावर गेला भाव!
सोलापूरचे नाव “हुतात्मा नगरी” करा : काकासाहेब कुलकर्णी