ज्योती देवरे यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार; उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचा आरोप

अहमदनगर, पुढारी ऑनलाईन: पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली झाल्यानंतर त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार केली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याची तक्रार कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. पदाचा गैरवापर करत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्याकडे ही तक्रार केली आहे.
- Crime : पत्नी-सासुच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
- अभिनेत्री खुशबू तावडेच डोहाळ जेवण…
- त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील अॅड. असीम सरोदे उपस्थित होते. पोटघन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,
देवरे यांनी वाळू उपसा, जमिनीचा अकृषक वापर रुपांतरित करून देणे अशा अनेक प्रकरणांत गैरप्रकार केला आहे.
त्यांनी मोठी वाहने, जेसीबी, डम्पर, ट्रॅक्टर अशी वाहने जप्त केली. त्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले नाही. त्यांच्या या कारवाया संशयास्पद आहे. त्यामुळे या कारभाराची चौकशी व्हावी.’
तक्रार दाखल झाल्यावर अॅड. सरोदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘देवरे यांच्यासारख्या प्रवृत्तींच्या विरोधात आमचा हा अर्ज आहे.
त्यांनी पुढील काळात आपल्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात.
तसाच अन्याय जर देवरे यांच्यावरही होत असेल तर मी स्वतः वकील म्हणून त्यांच्या बाजूने आहे.
- Mula Dam : मुळा धरणाचे ५ दरवाजे उघडले, नदी पात्रात विसर्ग सुरू
- Wardha River : वर्धा नदीत ११ जण बुडाले, ३ मृतदेह सापडले
मात्र, केवळ महिला म्हणून त्यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये. या पद्धतीने भ्रष्टाचाराची पाठराखण करता येणार नाही.
चौकशीतून आपली सुटका व्हावी यासाठी भावनिक ऑडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणे हा सुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे.
यामुळे कामाच्या ठिकाणी ज्या महिलांचे लैगिक अथवा अत्याचार होतात. त्याचे गांभीर्य कमी होते.’
- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली
- Vodafone Idea News : टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीमुळे तुमच्या मोबाईलचे रिचार्ज बिल वाढवू शकते, म्हणून सरकार नवीन योजनेच्या तयारीत
क्लिप व्हायरल कशी झाली?
गेल्या महिन्यात ज्योती देवरे यांनी आमदार नीलेश लंके यांच्या विरोधात तक्रार करणारे संभाषण असलेले आणि आत्महत्येचा इशारा देणारी क्लीप व्हायरल झाली.
त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देवरे यांची भेट घेऊन पाठराखण केली. त्यानंतर हे प्रकरण राजकीय बनत गेले.
लोकप्रतिनिधींकडून त्रास होत असल्याचे वक्तव्य देवरे यांनी क्लिपमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना ही क्लिप त्यांचीच असल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी ती आपण व्हायरल केली नसल्याचे म्हटले होते.
हेही वाचा :
- सौरभ गांगुलींकडून रवी शास्त्रींना क्लीन चिट! कोणतीही कारवाई होणार नाही
- खासदार प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
- Photos : ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरचा हटके अंदाज…