नगर : करंजी घाटामध्ये साडेसात लाखांची लूट | पुढारी

नगर : करंजी घाटामध्ये साडेसात लाखांची लूट

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील दर्ग्याजवळ चारचाकी आडवी लावून दोघा भावांना मारहाण करत संत तुकाराम साखर कारखान्याहून (ता. मुळशी, जि. पुणे) मुकादमकीसाठी आणलेले 7 लाख 77 हजार रुपये लुटल्याची घटना दि. 28 रोजीह सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिंदेंच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंचा दावा

फिर्यादी संतोष शहादेव बडे हे यांचा भाऊ बबन व त्यांचा मित्र आदिनाथ मिसाळ आणि आदिनाथचा भाऊ सुनिल मिसाळ असे चौघे दोन मोटारसायकलींवरुन कारखान्यावर 28 जून रोजी गेले होते. तेथून कमीशनचे 7 लाख 70 हजार रुपये घेऊन ते पाथर्डीकडे येत होते. संतोष बडे यांच्या मोटारसायकलला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करंजी घाटात एका चारचाकीने अडविले. त्यात तिघेजण मास्क बांधलेले होते. त्यांनी संतोष यांना मारहाण करुन गाडीची चावी घेतली.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मोटारसायकलच्या डिकीतून रोकड काढून घेतली. संतोष व त्यांचा भाऊ बबन यांना काठीने मारहाण करून चोरटे पळून गेले. त्यानंतर आदिनाथ मिसाळ व त्यांच्या भाऊ पाठीमागून आल्यानंतर त्यांच्याकडून चावी घेऊन बडे बंधूंनी मोटारसायकल सुरू केली आणि पाथर्डी पोलिसात आले.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

28 जून रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद 30 जून रोजी पोलिसांत दिली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये रस्ता लुटीच्या घटना वारंवार घडत आहे. यामध्ये स्थानिक चोरट्यांचा हात असल्याचेही तपासात पुढे आले आहे. एवढी मोठी रक्कम दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवली.नक्कीच या चोरट्यांनी यावर सुरुवातीपासून नजर ठेवली असावी, असा संशय वर्तवला जात आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात होणार विलीन

Back to top button